अल्ट्राटेक सिमेंट ली. चे कार्बन उत्सर्जनात घट करण्याचे उद्दिष्ठ सायन्स बेस्ड ईनिशीएटीव(SBTi)द्वारा प्रमाणित

याच कालावधी साठी त्यांनी स्कोप २ कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ६९ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सायन्स-बेस्ड टार्गेट इनिशिएटिव्हने (SBTi) अल्ट्राटेकच्या या जीएचजी कमी करण्याच्या उद्दिष्टांना प्रमाणित केले आहे.

    मुंबई : अल्ट्राटेक सिमेंट या ग्रे सिमेंट, व्हाईट सिमेंट आणि रेडी-मिक्स काँक्रिटमधील भारतातील सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांच्या कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्ठाला ‘सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिएटिव्ह’ ने (SBTi) ने प्रमाणित केले आहे.

    जुलै २०२० मध्ये कंपनीने आपल्या ग्रीनहाऊस गॅस (जीएचजी) उत्सर्जनात घट करण्याचा हेतू जाहीर केला होता व गेले काही महिने ते विज्ञानाधारित उद्दिष्टावर काम करीत होते . त्या नुसार अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने २०३२ पर्यंत आपले स्कोप१ कार्बन उत्सर्जन २०१७ च्या तुलनेत २७ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच याच कालावधी साठी त्यांनी स्कोप २ कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ६९ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सायन्स-बेस्ड टार्गेट इनिशिएटिव्हने (SBTi) अल्ट्राटेकच्या या जीएचजी कमी करण्याच्या उद्दिष्टांना प्रमाणित केले आहे. यात, सिमेंटतुल्य पदार्थांच्या निर्मिती दरम्यान होणारे निव्वळ कार्बन उत्सर्जन २०३२ पर्यंत ४६२ किलो प्रति टन पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे.

    पॅरिस करारा नुसार, औद्यगीकरण सुरू होण्यापुर्वीच्या तुलनेत पृथ्वीचे सरासरी तापमान वाढीचे प्रमाण २ अंश सेल्सिअसहून कमी, शक्यतो १.५ अंश सेल्सिअपर्यंत करण्याच्या मुळ उद्दिष्टांना ध्यानात ठेवून कंपनी स्तरावर अंगीकारणाऱ्या लक्ष्याला सायन्स बेस्ड टार्गेट म्हणतात. SBTi नुसार अल्ट्राटेकची लक्ष्ये पॅरीस कराराचा भाग असलेल्या ‘२ अंशां’हून कमी तापमानवृद्धीच्या जागतिक प्रयत्नांशी समानुपाती आहे आणि ती स्वीकारार्ह आहेत.

    “जलवायू परिवर्तन उद्योगांसाठी मोठी आव्हाने निर्माण करत आहे. मात्र, यातून शाश्वत उत्पादने आणि सेवा निर्माण करण्यासाठी तितक्याच मौल्यवान संधीही निर्माण होत आहेत. सायन्स-बेस्ड टार्गेट्स वर आधारित कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून अल्ट्राटेक सिमेंटने पुन्हा एकदा या क्षेत्रात आपले नेतृत्व सिद्ध केले आहे आणि या क्षेत्राला शाश्वत पायाभूत सुविधा उभारण्याचे नवे मार्ग शोधण्यासाठी मार्गदर्शन केले आहे,” असे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कैलाश झंवर म्हणाले.

    सायन्स बेस्ड टार्गेट इनिशिएटिव्ह द्वारे कमी-कार्बन अर्थव्यवस्थेत स्थित्यंतर करण्यासाठी तसेच कंपन्यांना स्पर्धात्मक लाभ मिळवून देण्यासाठी विज्ञानाधारीत लक्ष्य निश्चित केली जातात. सायन्स बेस्ड टार्गेट ईनीशीएटिव्ह हा कार्बन डिस्क्लोजर प्रोजेक्ट (CDP), युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट (UNGC), वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI),वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF) आणि वी मीन बिझनेस कोएलिशन(WMB)या संस्थांचा एक संयुक्त उपक्रम आहे.