परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ; पोलीस महासंचालक संजय पांडेंच्या पत्रावर प्रविण दरेकर यांची चौफेर टिका

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी परमबीर सिंग प्रकरणाच्या चौकशीतून अंग काढून घेतल्या बाबत राज्य सरकारवर चौफेर टिका केली आहे. सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. कधी नव्हे एवढे अधिकाऱ्यांचा वापर, अधिकाऱ्यांमधील संभ्रम अवस्था पाहायला मिळाली नाही असे त्यांनी म्हटले आहे. परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला पत्र दिले आहे. असे पत्र त्यांना कसे देता येईल असा सवाल दरेकर यांनी केला आहे. सरकारचे आदेश त्यांना बंधनकारक असताना ते चौकशीपासून का दूर राहात आहेत असा सवाल दरेकर यांनी केला आहे.

  मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी परमबीर सिंग प्रकरणाच्या चौकशीतून अंग काढून घेतल्या बाबत राज्य सरकारवर चौफेर टिका केली आहे. सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. कधी नव्हे एवढे अधिकाऱ्यांचा वापर, अधिकाऱ्यांमधील संभ्रम अवस्था पाहायला मिळाली नाही असे त्यांनी म्हटले आहे. परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला पत्र दिले आहे. असे पत्र त्यांना कसे देता येईल असा सवाल दरेकर यांनी केला आहे. सरकारचे आदेश त्यांना बंधनकारक असताना ते चौकशीपासून का दूर राहात आहेत असा सवाल दरेकर यांनी केला आहे.

  चौकशीपासून का दूर राहात आहेत

  माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, परमबीर सिंह सरकारचे दूत म्हणून काम करत होते, सरकारच्या विरोधात गेल्यानंतर त्यांच्यावर सरकारचा आक्षेप व्हायला लागला आहे. परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला पत्र दिले आहे. असे पत्र त्यांना कसे देता येईल असा सवाल दरेकर यांनी केला आहे. सरकारचे आदेश त्यांना बंधनकारक असताना ते चौकशीपासून का दूर राहात आहेत असा सवाल दरेकर यांनी केला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सरकारच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. तडजोड करत संजय पांडे यांना महासंचालक पदी निवडण्यात आले. सरकारला मदत करण्याबद्दल असलेली वचनबद्धता आणि ही सर्व प्रकरण निपटून देण्यासाठी त्यांना भूमिका दिली असताना त्यानी ते मान्य केले होते.

  सिंह यांच्या बोलण्यात तथ्य

  दरेकर पुढे म्हणाले की, परमबीर सिंह यांना समजवण्याची भूमिका संजय पांडे यांना करावी लागली, परंतु परमबीर सिंह सरकारची पोलखोल करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. संजय पांडे यांनी कशाप्रकारे परमबीर सिंह यांना समजवण्याचा प्रयत्न केला ते बाहेर येत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या बोलण्यात तथ्य असावे, त्यांच्या बोलण्यावरून अनेक लोक अडचणीत येतील असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

  देशात कायदा सर्वश्रेष्ठ

  दरेकर म्हणाले की, आपल्याकडे न्यायव्यवस्था इतकी भक्कम आहे की, अनिल देशमुख जे गृहखात्याचे प्रमुख होते त्यांना आता चौकशीला सामोरे जावे लागत आहे. देशात कायदा सर्वश्रेष्ठ आहे, नियम सर्वांना समान असून इतके सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे तात्पुरते कुणाला बळी देऊन विषय संपत नसतो, जे या विषयाच्या मुळाशी आहे ते न्यायव्यवस्थेद्वारे समोर येइल असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.