येणारा धोका समजा, एक पाऊल पुढे टाका; नितेश राणे यांचे महाविकास आघाडीतील नेत्यांना आवाहन

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आता महाविकास आघाडीतील आमदारांभोवती जाळं फेकण्यास सुरुवात केली आहे.

    मुंबई (Mumbai).  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत BJPचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आता महाविकास आघाडीतील आमदारांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. येणारा धोका समजा, एक पाऊल पुढे टाका, भाजप हाच एकमेव पर्याय आहे, असं भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे. राणे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचं आवतनच आघाडीच्या आमदारांना दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

    नितेश राणे यांनी ट्विट करून हे आवतन दिलं आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीमधे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत सगळे गल्लोगल्ली फिरले. तरीही लोकानी नाकारले. महाविकास आघाडीमधल्या आमदारांना हा संदेश आहे, येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका. भाजप हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे, असं ट्विट राणे यांनी केलं आहे. राणे यांनी या ट्विटमधून आघाडीच्या आमदारांना थेट भाजप प्रवेशाची ऑफरच दिली आहे.