५० पेटी भेज, वरना ठोक दुंगा! डॉन फहिम मचमचची बड्या व्यापाऱ्याला धमकी, पोलीस लागले कामाला

फहीम मचमच असं या गुंडाचं नाव आहे. हा गुंड दाऊद इब्राहिम गँगचा सदस्य असल्याची माहिती आहे. खंडणी विरोधी पथकाने या घटनेचा तपास सुरू केला असून मुंबईतील विविध भागात फहिम मचमच आणि दाऊद गँगच्या सदस्यांची माहिती घेण्याचं काम सुरू केलंय. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे याची रितसर तक्रार करण्यात आल्यानंतर तपासाची चक्रं वेगानं फिरायला सुरुवात झालीय. 

    मुंबईत अंडरवर्ल्ड पुन्हा डोकं वर काढत असल्याचं चित्र दिसू लागल्यामुळं खळबळ उडालीय. मुंबईच्या घाटकोपरमधील एका बड्या व्यापाऱ्याला अंडरवर्ल्ड डॉन फहिम मचमचकडून खंडणीसाठी फोन आल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय. या डॉननं व्यापाऱ्याकडे तब्बल ५० लाखांच्या खंडणीची मागणी केलीय.

    फहीम मचमच असं या गुंडाचं नाव आहे. हा गुंड दाऊद इब्राहिम गँगचा सदस्य असल्याची माहिती आहे. खंडणी विरोधी पथकाने या घटनेचा तपास सुरू केला असून मुंबईतील विविध भागात फहिम मचमच आणि दाऊद गँगच्या सदस्यांची माहिती घेण्याचं काम सुरू केलंय. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे याची रितसर तक्रार करण्यात आल्यानंतर तपासाची चक्रं वेगानं फिरायला सुरुवात झालीय.

    मचमचच्या आवाजाचे नमुने

    फहिम मचमचच्या आवाजाचे नमुने पोलिसांना मिळालेत. त्याच्या आधारे फहिमचा शोध घेतला जातोय. डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकीलसाठी मचमच काम करत असल्याची माहिती आहे. या व्यापाऱ्याला आलेल्या कॉलमधील आवाज हा फहिम मचमचच्या ऑडिओ सँपलशी जुळत नसल्याची माहिती पोलीसांनी दिलीय.

    दाऊद इब्राहिमच्या टोळीच्या नावाचा वापर करून एखादी स्थानिक टोळीच हा प्रकार करत असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्या दृष्टीनंही पोलीस तपास करतायत. हा तपास निर्णायक टप्प्यावर असून त्याबाबत अधिक माहिती दिली, तर व्यापाऱ्याच्या जीवाचा धोका वाढू शकतो, असं पोलिसांचं म्हणणं आहे.