मुंबईत ‘या’ नाल्यामध्ये सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिसांसमोर नवे आव्हान

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अनेक गुन्हे(crime in mumbai) घडत आहेत. पोलिसांसमोर (challenges before mumbai police)नवीन आव्हाने उभी राहत आहेत. अशातच नाल्यामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांसमोर मृत्यू झालेल्या माणसाची माहिती शोधण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे.

    मुंबई : खाडीत मृतदेह आढळलेल्या मनसुख हिरेनच्या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच आला असतानाच आता पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मुंबईत(dead man found in seepage of mumbai) आढळला आहे. विक्रोळीतील टागोरनगर परिसरातील एका नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.  विक्रोळी पोलीस ठाणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    मृत्यू झालेल्या माणसाचे वय अंदाजे ४० ते ४५ असल्याची माहिती मिळाली आहे.  मृतदेह आता राजेवाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.

    गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अनेक गुन्हे घडत आहेत. पोलिसांसमोर नवीन आव्हाने उभी राहत आहेत. अशातच नाल्यामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांसमोर मृत्यू झालेल्या माणसाची माहिती शोधण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे.