Unidentified car enters Chief Minister Uddhav Thackeray's convoy; Filed a crime against the driver

मुख्यमंत्री ठाकरे साकीनाका अत्याचार प्रकरणाबाबत गृहविभागासोबतची बैठक संपवून घराकडे निघाले होते. त्याच दरम्यान एक अज्ञात कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली. ही मर्सिडिज कार एका व्यापाऱ्याची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित गाडीच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात अचानक एक अज्ञात कार शिरल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. ही एका व्यापाऱ्याची कार असल्याची माहिती समोर आली आहे.

    मुख्यमंत्री ठाकरे साकीनाका अत्याचार प्रकरणाबाबत गृहविभागासोबतची बैठक संपवून घराकडे निघाले होते. त्याच दरम्यान एक अज्ञात कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली. ही मर्सिडिज कार एका व्यापाऱ्याची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित गाडीच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सुरक्षेसाठी असलेल्या रक्षकांनी त्या अज्ञात वाहन चालकाला ताफ्यातून बाहेर पडण्याचा इशारा केला होता. पण त्याने गाडी थांबवली नाही. पुढे पोलिसांनी तत्काळ या वाहनचालकाला थांबवले आणि त्याची चौकशी केली. त्यानंतर मर्सिडीज चालक मलबार हिल परिसरात राहणारा व्यापारी असल्याचे समोर आले आहे.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना