केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल

भाजप नेते नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे. उद्या ते जन आशिर्वाद यात्रेसाठी जाणार आहेत. मात्र त्यापूर्वी रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात पोहोचले.

    मुंबई : भाजप नेते नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे. उद्या ते जन आशिर्वाद यात्रेसाठी जाणार आहेत. मात्र त्यापूर्वी रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात पोहोचले.

    नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्रभर वादंग माजलं होतं. या सगळ्या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती. पाच ते सहा तासांनंतर त्यांना जामीन मिळाला. याचदरम्यान राणे यांची प्रकृती बिघडली होती.