…म्हणून नारायण राणे न्यायालयात राहिले गैरहजर

राणे यांचे वकील ऍड. सचिन चिकणे यानी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख दयानंद गावडे यांच्याकडे अर्ज सादर केला असून त्यात प्रकृतीच्या कारणास्तव राणे गैरहजर राहीले असल्याचे सांगण्यात आले आहे.

    मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज आक्षेपार्ह विधान प्रकरणी न्यायालयाने जामिन देताना आदेश दिल्यानुसार रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावणे टाळले आहे. राणे यांचे वकील ऍड. सचिन चिकणे यानी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख दयानंद गावडे यांच्याकडे अर्ज सादर केला असून त्यात प्रकृतीच्या कारणास्तव राणे गैरहजर राहीले असल्याचे सांगण्यात आले आहे.

    आक्षेपार्ह विधान प्रकरणी अटक/जामिन

    २३ ऑगस्ट रोजी राणे यानी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभरातून त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यांनतर राणे यांना २४ तारखेला सायंकाळी अटक करण्यात आली होती आणि रात्री उशीरा न्यायालयाने काही शर्तीवर जामीन मंजूर केला होता.

    ३० ऑगस्ट आणि १२ सप्टेंबर हजेरी लावण्याची अट

    त्यात ३० ऑगस्ट आणि १२ सप्टेंबर या दोन दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात सकाळी अकरा वाजता हजेरी लावण्यास सांगण्यात आले होते. तसेच पुराव्यांबाबत आणि कागदपत्रांबाबत छेडछाड नकरण्याचे तसेच पोलिसांना आवाजाचे नमूने घेण्यास सहकार्य करण्याचे आदेशीत करण्यात आले होते. मात्र आता प्रकृतीच्या कारणास्तव राणे यांची हजेरी आज टळली आहे. राणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख पोलिस निरिक्षक दयानंद गावडे यांच्या समोर हजर राहणार असल्याने तेथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. मात्र, राणे येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.