ramdas aathavle meet Rajyapal

कंगना राणौतच्या कार्यालय तोडकामाची नुकसान भरपाई मिळावी तसेच बीएमसीच्या ज्या अधिकाऱ्यांनी तोडकाम केले त्यांच्याव कठोर कावाई करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतच्या ( Kangana Ranaut)  मुंबईतील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने तडख कारवाई करुन अनधिकृत बांधकाम पाडले. तीला २४ तासाची नोटीस दिली असून कंगनाच्या अनुपस्थित ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यामुळे बीएमसीने नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच कंगनावर अन्याय झाला आहे. या प्रकरणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale)  यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagatsingh Koshyari ) यांची भेट घेतली.

कंगना राणौतच्या कार्यालय तोडकामाची नुकसान भरपाई मिळावी तसेच बीएमसीच्या ज्या अधिकाऱ्यांनी तोडकाम केले त्यांच्याव कठोर कावाई करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रात वाढत असलेला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीचे राज्य सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारला योगय ते निर्देश द्यावेत यासाठी आज राज्यपाल भगतसिंग यांची भेट घेतली आहे असे रामदास आठवले यांनी सांगितले.