केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली माजी नौदल अधिकारी मदन शर्मांची भेट

माजी नौदल अधिकारी मदश शर्मा हे या मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यांच्या निवासस्थानी भेटीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले गेले आहेत.

मुंबई : माजी नौदल अधिकाऱ्याला (Retired Navy Officer) शिवसैनिकांनी (ShivSena) मुख्यमंत्र्यांवरील हस्यात्मक व्यंगचित्र शेअर केल्यामुळे मारहाण करण्यात आली. यामध्ये माजी नौदल अधिकारी मदश शर्मा (Madan Sharma)  हे या मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यांच्या निवासस्थानी भेटीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले गेले आहेत.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ल्याचा घटनेत ६ जणांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यामध्ये एक शिवसेना शाखा प्रमुख होते. या सर्वांना काल जामीन मिळाला आहे. गेल्या शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर शेअर केल्यामुळे या मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली होती.


या घटनेचा भाजपने आंदोलन करुन निषेध केला आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवत राज्यसरकारवर टीका केली आहे.