Unique love story of cow and bull

मंदिराच्या परिसरात चहा विक्री करणाऱ्या मुनियांदी नावाच्या एका व्यक्तीने या दोन्ही गाय आणि बैलाची लहानपणापासून देखभाल केली. तो बैल पालामेदू मंदिराचा आहे. त्याच्यासोबतच मुनियांदी याची गाय लहानाची मोठी झाली. पण लॉकडाऊनमध्ये मुनियांदी याला आर्थिक चणचण जाणवू लागली. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्याने आपल्या लक्ष्मी या गाईची 20 हजार रुपयांमध्ये विक्री केली. गाईला घेऊन जाण्यासाठी त्याने तिला मिनी ट्रकमध्ये चढवले. पण हे दृष्य मंजामलीने बघितले आणि गाडीसमोर उभे राहून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला.

    मदुराई : प्रेमकथा प्राण्यांमध्येही असातात हे सांगितले तर कदाचित आश्चर्य व्यक्त करण्यात येईल. ही प्रेमकहाणी आहे एक गाय आणि बैलाची. बैलाचे नाव मंजामली, तर गायीचे नाव लक्ष्मी आहे. तामिळनाडूच्या मदुराई येथील ही घटना आहे.

    मंदिराच्या परिसरात चहा विक्री करणाऱ्या मुनियांदी नावाच्या एका व्यक्तीने या दोन्ही गाय आणि बैलाची लहानपणापासून देखभाल केली. तो बैल पालामेदू मंदिराचा आहे. त्याच्यासोबतच मुनियांदी याची गाय लहानाची मोठी झाली. पण लॉकडाऊनमध्ये मुनियांदी याला आर्थिक चणचण जाणवू लागली. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्याने आपल्या लक्ष्मी या गाईची 20 हजार रुपयांमध्ये विक्री केली. गाईला घेऊन जाण्यासाठी त्याने तिला मिनी ट्रकमध्ये चढवले. पण हे दृष्य मंजामलीने बघितले आणि गाडीसमोर उभे राहून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला.

    पण थोड्यावेळाने गाईला घेऊन जाणारी गाडी सुरू होताच त्याने थेट त्या गाडीच्या मागे धाव घेतली. तब्बल एक किलोमीटरपर्यंत हा बैल त्या गाडीचा पाठलाग करत होता. अखेर थकल्यानंतर त्याने गाडीचा पाठलाग करणे सोडले. पण, या सर्व घटनेचा व्हीडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकण्यात आला.

    व्हायरल झालेल्या व्हीडिओबाबतची माहिती तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांचा मुलगा जयप्रदीप याला मिळाली. त्यानंतर जयप्रदीपने लक्ष्मी गाय खरेदी करणाऱ्याचा शोध घेतला आणि त्याच्याकडून गाय परत विकत घेतली व त्या मंदिराला दान केली, यासोबतच मंजामली आणि लक्ष्मी पुन्हा एकत्र आले.