कर्नल प्रसाद पुरोहित
कर्नल प्रसाद पुरोहित

मालेगाव खटल्यातील आरोंपीविरोधात युएपीएच्या कलमांअंतर्गत खटला चालविण्याचा एनआयए न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाविरोधात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी याचिका दाखल केली आहे. या खटल्यातून दोषमुक्त करा, अशी विनंती करताना कनिष्ट न्यायालयातील खटल्याला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंतीही कर्नल पुरोहित यांनी केली आहे.

    मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने आपल्याला कोणत्याही पूर्व कल्पनेशिवाय अटक केली असल्याचा दावा करत अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद ले. कर्नल प्रसाद पुरोहितकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

    मालेगाव खटल्यातील आरोंपीविरोधात युएपीएच्या कलमांअंतर्गत खटला चालविण्याचा एनआयए न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाविरोधात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी याचिका दाखल केली आहे. या खटल्यातून दोषमुक्त करा, अशी विनंती करताना कनिष्ट न्यायालयातील खटल्याला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंतीही कर्नल पुरोहित यांनी केली आहे.

    या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. अभिनव भारत संघटनेवर पाळत ठेवण्याची जबाबदारी पुरोहित यांच्यावर सोपाविण्यात आली होती. त्यासाठी ते संपूर्णपणे आपल्या कामात सक्रिय होऊन कर्तव्य बजावत होते. त्यांच्या सेवाकार्यात त्यांनी मोठी कामे केली असून जीवावर उदार होऊन अनेक दहशतवाद्यांना अटक केल्याकडे पुरोहित यांच्यावतीने अँड. शिवदे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यांच्या युक्तिवादाला एनआयएच्यावतीने अँड. संदेश पाटील यांनी तीव्र विरोध केला.

    जर कनिष्ठ न्यायालयाने निर्णय शहनिशा करून दिला आहे. तो निर्णय अथवा आदेश चुकीचा आहे, या निष्कर्षावर जोपर्यंत उच्च न्यायालय येत नाही, तोपर्यंत कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करता येत नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. सदर याचिकेवर वेळेअभावी सुनावणी पूर्ण होऊ न शकल्यामुळे न्यायालयाने सुनावणी ३० जुलैपर्यंत तहकूब केली.