pollution in nagpur

प्रदुषणामुळे नागरिकांचे अकाली मृत्यू होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलीय. विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिलीय. मुंबईतील वाढत्या वायुप्रदुषणाबद्दल आमदार अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आलीय. 

    गेल्या काही वर्षांपासून मुंबई आणि दिल्ली यासारख्या महानगरांमधील प्रदुषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचं चित्र आहे. दिल्लीत तर प्रदुषण धोकादायक पातळीच्या वर पोहोचलंय. तर मुंबईतील प्रदुषणाची पातळी दिल्लीच्य तुलनेत कमी असली तरी चिंताजनक आहे. मुबईतील चेंबूर, वांद्रे, कुर्ला, वरळी, कुलाबा आणि भांडुप या परिसरातील प्रदुषणाची पातळी वाढली असल्याचं निरीक्षण सफर या संस्थेच्या पाहणीमध्येही नोंदवण्यात आलं होतं.

    प्रदुषणामुळे नागरिकांचे अकाली मृत्यू होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलीय. विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिलीय. मुंबईतील वाढत्या वायुप्रदुषणाबद्दल आमदार अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आलीय.

    डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत मुंबईतील वायू प्रदुषण अधिक होते. या कालावधीत वायूप्रदुषणाची पातळी नेहमीपेक्षा वाढल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं. त्यानंतर प्रदुषणाच्या पातळीत काहीशी घट झालीय. मात्र त्या कालावधीत २०० ते ३०९ पार्टीक्युलेट मॅटर इतक्या प्रदुषणाची नोंद झाली असून ५०० मीटरहून अधिक अंतरापेक्षा लांबचं दिसत नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं.

    प्रदुषण कमी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असल्याचंही या लेखी उत्तरात नमूद करण्यात आलंय.