मुंबई सेंट्रल रेल्वेमध्ये सिनिअर रेसिडंट पदांसाठी जागा रिक्त, अर्ज कसा पाठवायचा? : जाणून घ्या

मुंबई मध्य रेल्वेमार्फत रिक्त जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना रेल्वेकडून नुकतीच जारी करण्यात आली आहे. सिनिअर रेसिडंट या पदांसाठी हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्याद्वारे आपला अर्ज ऑफलाइन सादर करावा लागणार आहे.

  मुंबई : मुंबई मध्य रेल्वेमार्फत रिक्त जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना रेल्वेकडून नुकतीच जारी करण्यात आली आहे. सिनिअर रेसिडंट या पदांसाठी हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्याद्वारे आपला अर्ज ऑफलाइन सादर करावा लागणार आहे.

  अर्जाची निवड करून त्यातील निवडक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 15 जुलै 2021 असणार आहे.

  कोणत्या जागेसाठी भरती?

  सिनिअर रेसिडंट – एकूण जागा 07

  शैक्षणिक पात्रता

  या पदासाठी उमेदवार दहावी, बारावी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट असणं महत्त्वाचं आहे. किंवा DM / DNB असणं आवश्यक आहे.

  अर्ज पाठवण्याचा पत्ता – Office of the Medical Director, Dr. B.A.M. Hospital

  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2021