BMC लसीकरण केंद्रांचा विस्तार करणार; ५०० वर जाणार केंद्रांची संख्या

केंद्र सरकारने २१ जूनपर्यंत सबईतर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पालिकेने आता लसीकरण केंद्र वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईत सध्या २५९ लसीकरण केंद्र आहेत. आता पालिका केंद्रांच्या विस्तारावर काम करत आहे. आरोग्य विभागाच्या मते, येणाऱ्या काही दिवसांत पालिकेच्या लसीकरण केंद्रांची संख्या ५०० वर जाईल, त्यानुसार तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

  मुंबई : केंद्र सरकारने २१ जूनपर्यंत सबईतर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पालिकेने आता लसीकरण केंद्र वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईत सध्या २५९ लसीकरण केंद्र आहेत. आता पालिका केंद्रांच्या विस्तारावर काम करत आहे. आरोग्य विभागाच्या मते, येणाऱ्या काही दिवसांत पालिकेच्या लसीकरण केंद्रांची संख्या ५०० वर जाईल, त्यानुसार तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

  लसीच्या डोसच्या तुटवड्यामुळे पालिकेच्या केंद्रांमध्ये आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर्स, फ्रन्ट लाईन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे. केंद्र सरकारला १४ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थींचे लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांकडे दिली होती. पंरतु, राज्यांना लस उपलब्ध होत नसल्यामुळे हा घटक लसीकरणापासून वंचित आहे. केवळ खासगी रुग्णालयांमध्ये १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण होत आहे. ही अडचण पाहता अलीकडेच केंद्र सरकारने या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आणि राज्य सरकारांना लसीचा पुरवठा करण्याचेही ठरवले आहे. त्यामुळे आता केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे.

  केंद्र सरकार राज्य सरकारला लस देणार आहे, मात्र तरीही पालिकेने वॅक्सीन कंपन्यांची बातचीत सुरू ठेवली आहे. यासंदर्भात पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल की, केंद्र सरकार आम्हाला पर्याप्त मात्रेमध्ये लसीचा पुरवठा करेल, यावर आमचा विश्वास आहे. याचा अर्थ केंद्रावर अवलंबून राहणे योग्य नाही. काही कारणांमुळे तुटवडा जाणवला तर पालिका सक्षम असायला हवी, त्यानुसार आम्ही प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

  १ मे पासून केंद्र सरकारने १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली, परंतु, लसीचा पर्याप्त साठा राज्य सरकारांना पुरवला नाही. त्यामुळे या वयोगटातील लसीकरणावर त्याचा विपरित परिणाम झाला. राज्यात विशेषत: मुंबईत सध्या पालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे. तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांमध्ये मात्र तरुणांचे लसीकरण होत आहे.

  अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांिगतले की, आम्ही लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट करण्यावर काम करत आहोत. शहरात ५०० हून अधिक लसीकरण केंद्र असतील. ही केंद्रे कुठे सुरू करायची, यासाठी जागाही निश्िचत करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पर्याप्त मात्रेमध्ये लसीचा पुरवठा होईल, याची आम्हाला अपेक्षा आहे. मुंबईत कोविशिल्ड आण्िा कोवॅक्सीन स्टोअर करण्यासाठी काहीही अडचणी नाहीत. जर केंद्राकडून स्पुटनिक लस मिळाली तर ती लसही अनुकूल वातावरणात स्टोअर करण्याची क्षमता आहे आणि शहरातील कोणत्याही केंद्रांवर पाठवण्याची व्यवस्था आहे. कांजूरमार्ग स्थित स्टोरेज फॅसिलिटरमध्ये थोडासा बदल केल्यानंतर आम्ही ती लसही स्टोअर करू शकतो.

  - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई पालिका
  हे सुद्धा वाचा