35 वर्षांखालील तरुणांनाही लस द्या; जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांच्या कोरोना लसीकरणाची ताबडतोब व्यवस्था करा, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. भारत हा तरुणांचा देश ओळखला जातो. त्यामुळे 18 ते 35 या वयातील तरुण पिढीचे कोरोना लसीकरण करा, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे. जगभरात भारत हा तरुणांचा देश आहे अशी आपली ओळख आहे. या कोरोना संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना जास्त होताना दिसतं आहेत. त्यामुळे 18 ते 35 वयोगटातील तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

    त्याशिवाय पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे, असेही आव्हाड म्हणाले.

    पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असेही त्यांनी भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.