१ मे पासून लसीकरण होणंच शक्य नाही, आरोग्यमंत्री टोपेंनी दिली ही माहिती, सांगितलं खरं कारण

१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मोहिम फसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लसीकरण करण्याची कल्पना चांगली आहे, मात्र प्रत्यक्षात लसीच उपलब्ध नसल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. सर्वांचं लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र लसीच उपलब्ध नसतील, तर लसीकरण कसे करणार, असा सवाल राजेश टोपे यांनी उपस्थित केलाय. 

    देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंमल आहे. दररोज ३ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकाधिक नागरिकांच्या लसीकरणाचा उपाय सांगितला जातोय. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केलीय खरी, मात्र प्रत्यक्षात त्यासाठी लसीच उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातंय.

    १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मोहिम फसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लसीकरण करण्याची कल्पना चांगली आहे, मात्र प्रत्यक्षात लसीच उपलब्ध नसल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. सर्वांचं लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र लसीच उपलब्ध नसतील, तर लसीकरण कसे करणार, असा सवाल राजेश टोपे यांनी उपस्थित केलाय.

    बुधवारी कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या पुरवठ्याबाबतचं चित्र मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय मुख्यमंत्री कळवतील, असं टोपेंनी म्हटलंय. त्यामुळे लसीकरणाबाबतचा निर्णय आताच जाहीर करणं योग्य होणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

    महाराष्ट्र आणि आसामअगोदच राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि केरळ या राज्यांनी १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण शक्य नसल्याचं जाहीर केलंय. दरम्यान, महाराष्ट्रानं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही लसनिर्मात्या कंपन्यांशी संपर्क साधला. मात्र दोन्हीकडून कुठलाही प्रतिसाद आला नसल्याचं सांगण्यात आलंय.

    केंद्र सरकारनं लसींची मागणी नोंदवायला उशीर केल्यामुळे आणि कमी प्रमाणात मागणी नोंदवल्यामुळे हे घडल्याचं सांगितलं जातंय.  लसनिर्मात्या कंपन्यांनी अगोदर केलेल्या कमिटमेंट्स पाळल्यामुळे आता अचानक त्यांना उत्पादन वाढवणं कठीण जात असल्याचंही चित्र दिसतंय.