मुंबईत आजपासून ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू, ठाणे आणि नवी मुंबईतही मिळणार लस, असं आहे धोरण

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लसी घेता येणं शक्य होईल, असं सांगण्यात आलंय. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून या वयोगटातील नागरिक स्लॉट बुक करू शकतात आणि आपली लस निश्चित करू शकतात, असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय. याशिवाय ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी ठाणे महापालिकेकडून आज (शनिवारी) विशेष लसीकरण मोहिम राबवली जातेय. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ठाण्यातील पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर ही मोहिम राबवली जाणार आहे. 

    महाराष्ट्राची राजधानी मुंबईने कोरोनावर विजय मिळवल्याचं चित्र असून मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट हा ४ टक्क्यांच्याही खाली गेलाय, तर उपलब्ध असणाऱ्या ऑक्सिजनची बेडची संख्या ही ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत लसीकरण मोहिमेलाही वेग येत असल्याचं चित्र आहे. मुंबईत आजपासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु करण्यात आलंय.

    मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लसी घेता येणं शक्य होईल, असं सांगण्यात आलंय. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून या वयोगटातील नागरिक स्लॉट बुक करू शकतात आणि आपली लस निश्चित करू शकतात, असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय. याशिवाय ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी ठाणे महापालिकेकडून आज (शनिवारी) विशेष लसीकरण मोहिम राबवली जातेय. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ठाण्यातील पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर ही मोहिम राबवली जाणार आहे.

    केंद्र सरकारनं १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची घोषणा केली होती. मात्र देशात लसीच उपलब्ध होत नसल्याने या वयोगटातील लसीकरण हे कासवाच्या वेगाने होत होतं. आता हळूहळू लसींचा पुरवठा वाढत आहे. त्याचप्रमाणं प्रत्येक राज्यांवर टाकलेली लसी खरेदी करण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारनं पुन्हा स्वतःकडं घेतली आहे. त्यामुळे राज्यांना केवळ लसीकरणाचं नियोजन करायचं आहे. त्यानुसार ३० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकऱणाला मुंबई परिसरात सुरुवात झालीय.

    मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने कमी होत असून शुक्रवारी नव्या ७६२ रुग्णांची नोंद झालीय, तर १९ जणांचा मृत्यु झालाय. तर ६८४ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. मुंबईतील कोरोना रिकव्हरी रेट हा ९५ टक्के आहे. मुंबईतील लसीकरणासोबत आता इतर बाबतीत दिलासा मिळतो का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.