रूग्णसंख्या-मृत्यूदर वेगाने कमी होत असताना आरोग्य विभागात लसीकरणाची लगबग! अद्यापही लशींचे प्रमाण नगण्य असल्याने चिंता!

वेगाने रूग्णसंख्या (the number of patients) आणि मृत्य़ूचे प्रमाण (mortality rate) कमी होत असताना त्वरेने लसिकरण करण्याचे आव्हान राज्य सरकार (The state government) समोर असल्याची माहिती मंत्रालयीन उच्चपदस्थ अधिका-यांनी दिली आहे.

  मुंबई (Mumbai). वेगाने रूग्णसंख्या (the number of patients) आणि मृत्य़ूचे प्रमाण (mortality rate) कमी होत असताना त्वरेने लसिकरण करण्याचे आव्हान राज्य सरकार (The state government) समोर असल्याची माहिती मंत्रालयीन उच्चपदस्थ अधिका-यांनी दिली आहे. पावसाळयाचा जोर वाढण्यापूर्वी घाईने मुंबईतील लसीकरण (Vaccination) पूर्ण करण्याची लगबग  आता सुरू झाली असून जून अखेरीस केंद्र सरकारने (the central government) पुरेशा लसी द्याव्या यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

  १०४ दिवसांतील सर्वांत कमी रूग्ण संख्या
  मागील १०४ दिवसांत काल (दि.१४) राज्यात सर्वात कमी ८१२९ कोरोना बाधित रूग्णआढळून आल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली आहे. या पूर्वी २ मार्च रोजी राज्यात ७८६३ बाधित रूग्ण आढळून आले होते. मुंबई शहरात देखील फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला दुस-या लाटेची सुरूवात होत असताना ५३० बाधित रूग्ण आढळून आले होते त्यांची संख्या काल ४६१ इतकी ११८ दिवसांतील कमी संख्या असल्याचे सांगण्यात आले.

  मृत्यूदरातही कमालीची घट
  आरोग्य विभागातून देण्यात आलेल्या माहितीनुसार काल शंभर दिवसांनतर प्रथमच मृत्यूदरातही घट नोंदविण्यात आली, मात्र त्यात त्यापूर्वीच्या १३९२ मृत्यू संख्येची भर पडली आहे. १७ मे नंतर राज्यात मृत्यूदरात कमालीची वाढ झाली होती त्यावेळी प्रतिदिवशी १९ ११६ पर्यंत हा दर वाढला होता. विभागातील अधिका-यांच्या मते सर्वच जिल्ह्यातील मृत्यूंच्या आकड्यांचा ताळमेळ आता पूर्ण होत आला असून त्यात मृत्यूदर देखील ओसरण्यास सुरूवात झाल्याचे दिसत आहे. राज्यात सर्वाधिक मृत्य़ू नोंद १ १२ ६९६ पर्यंत झाली आहे.

  लसीकरणाच्या मोहीमेवर लक्ष केंद्रीत
  मुंबईतही देनंदिन मृत्यूसंख्या घटत असून काल १९ जणांचा मृत्यू झाला आहेजी संख्या मागील महिन्यात १५ २०२ प्रति दिवस इतकी वाढली होती. मुंबईत कालची रूग्णसंख्या १० ८ ८ तर ४० टक्केऑक्सिजन बेडची व्याप्ती होती. त्यामुळे आता लसीकरणाच्या मोहीमेवर लक्ष केंद्रीत करण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे या अधिका-यांनी सांगितले.मात्र अद्यापही आवश्यक प्रमाणात लशींचा पुरवठा होत नसल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.