covishield vaccine

शुक्रवारी पालिकेला ८७ हजार लसीचे डोस मिळण्याची शक्यता महापौरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लगेच शनिवारपासून पुन्हा लसीकरण मोहीम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. महापौर म्हणाल्या, उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑगस्टपर्यंत लसीचे दोन्ही डोस देण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच महापौरांनी पालिका कोणत्याही दलालाकडून लस खरेदी करत नसल्याचेही सांगितले.

  मुंबई : शुक्रवारी मुंबईला कोविशिल्ड लसीचे ८७ हजार डोस मिळण्याची शक्यता असल्याची माहिती महापाैर किशोरी पेडणेकर यांनी गुरूवारी बोलताना दिली. तसेच त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून लसीकरण मोहीम सुरू होईल, असे त्यांनी सांगीतले. मुंबई पालिकेकडे पर्याप्त लसीचा साठा नसल्यामुळे पालिका आणि राज्य सरकारद्वारे संचालित केंद्रांमध्ये गुरूवारी लसीकरण थांबवले. मुंबईत कोविड १९ प्रतिबंध लसीकरण एकूण ३५२ केंद्रांपैकी २४३ केंद्रांचे संचालन पालिका आणि २० केंद्रांचे संचालन राज्य सरकार करत आहे.

  शुक्रवारी पालिकेला ८७ हजार लसीचे डोस मिळण्याची शक्यता महापौरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लगेच शनिवारपासून पुन्हा लसीकरण मोहीम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. महापौर म्हणाल्या, उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑगस्टपर्यंत लसीचे दोन्ही डोस देण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच महापौरांनी पालिका कोणत्याही दलालाकडून लस खरेदी करत नसल्याचेही सांगितले.

  बुधवारी ४९,८३३ लाभार्थ्यांचे लसीकरण

  मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. बुधवारी ४९ हजार ८३३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. १६ जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ३३ लाख ७४ हजार २६१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

  लसीकरण मोहिम

  मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. १ मार्चपासून ६० वर्षांवरील वयोवृद्ध तसेच ४५ ते ५९ वर्षांमधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. १ मे पासून १८ ते ४५ वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत कोविन अॅपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या, असे आवाहन पालिकेने केले आहे.

  मुंबईत म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून हे चिंताजनक आहे. पालिकेने या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या औषधांची खरेदी केली आहे. लसीकरणावरही पालिकेचा जोर आहे. पर्याप्त साठा मिळाल्यानंतर वेगाने लसीकरण करता येऊ शकते. ­

  -किशोरी पेडणेकर, महापौर