तीन दिवसांसाच्या सुट्टीनंतर मुंबईमध्ये आजपासून पुन्हा लसीकरणास सुरुवात ; जाणून घ्या किती आहे लसीचा साठा

सद्यस्थितीला शहरात दररोज ४० ते ५९० हजार लसीचे डोस दिले जातात. येत्या मंगळवापर्यंत शहरातील लसीचा साठा पूर्वपदावर येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे

    मंबई: मागील तीन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईमध्ये आजपासून(१२ जुलै) पुन्हा लसीकरणास सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस पुरेल इतका लसीचा साठा उपलब्ध आहे. यामध्ये एकूण १ लाख ३५ हजार लसीचे डोस उपलब्ध असून त्यात कोविशिल्डचे ८५ हजार डोस आणि कोवॅक्सिनचे ५० हजार डोसचा समावेश आहे. सद्यस्थितीला शहरात दररोज ४० ते ५९० हजार लसीचे डोस दिले जातात. येत्या मंगळवापर्यंत शहरातील लसीचा साठा पूर्वपदावर येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

    गेल्या २४ तासांमध्ये ८ हजार ५३५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज ६ हजार १३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत ५९,१२,४७९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के इतके झाले आहे. शनिवारी नांदेड, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांत एकही रुग्ण आढळलेला नाही.