लसींच्या साठ्याअभावी आज लसीकरण बंद

कोरोनाचा लसीकरण मोहिमेसाठी लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या गुरुवारी ३ जून रोजी लसीकरण बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

  मुंबई : कोरोनाचा लसीकरण मोहिमेसाठी लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या गुरुवारी ३ जून रोजी लसीकरण बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

  लशींच्या साठ्याच्या उपलब्धतेनुसार निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने कळविण्यात येते. दरम्यान, उद्या दिवसभरामध्ये लससाठा प्राप्त होण्याची शक्यता आहे.
  लस साठा उपलब्ध झाल्यास पुढील दिवसापासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा