Vaccination with all the rules in place; After the mayor visited The Lalit Hotel, a shocking incident took place

या पाहणीत इतर अनेक गोष्टी समोर आल्या. ललित हॉटेलमध्ये कोल्ड चेन मेन्टेन केली जात नव्हती. घरगुती वापराच्या फ्रीजमध्ये कोविड लसींचा साठा करण्यात आला होता. आइस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात होता. त्यामुळे ‘द ललित’मध्ये झालेल्या लसीकरणाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापौर पेडणेकर यांनी या प्रकाराबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांना जाब विचारला.

    मुंबई : कोविड लसींच्या तुटवड्यामुळे सरकारी यंत्रणा चिंतेत असतानाच दुसरीकडे लसीकरणाच्या बाबतीत अनेक गैरप्रकार उघडकीस येत आहेत. मुंबईतील ‘द ललित’ हॉटेलमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून येथे नागरिकांना कोविड लस दिली जात असल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अचानक या हॉटेलात जाऊन पाहणी केली तेव्हा हे सगळे उघडकीस आले.

    मुंबईतील काही हॉटेल त्यांच्या पॅकेजमधून कोविड लस देत आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने अशा हॉटेलांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत. ‘द ललित’ या हॉटेलात देखील ३,५०० रुपयांच्या पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर महापौर पेडणेकर यांनी चौकशी करण्यासाठी थेट ‘द ललित’ हॉटेलला भेट दिली. या हॉटेलमध्ये दिवसाला ५०० लोकांना लस देण्यात आल्याची बाब समोर आली. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: माध्यमांना याबाबत माहिती दिली.

    या पाहणीत इतर अनेक गोष्टी समोर आल्या. ललित हॉटेलमध्ये कोल्ड चेन मेन्टेन केली जात नव्हती. घरगुती वापराच्या फ्रीजमध्ये कोविड लसींचा साठा करण्यात आला होता. आइस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात होता. त्यामुळे ‘द ललित’मध्ये झालेल्या लसीकरणाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापौर पेडणेकर यांनी या प्रकाराबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांना जाब विचारला.

    ‘द ललित’मध्ये क्रिटीकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून लस दिली जात आहे. क्रिटीकेअर रुग्णालयाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यात ललित हॉटेलचा फारसा संबंध नाही. मात्र, येथील लस साठवणीच्या पद्धतीबाबत साशंकता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार असून क्रिटीकेअर रुग्णालयाचीही चौकशी केली जाईल, असे महापौरांनी सांगितले.