मुंबईत पुन्हा लसींचा तुटवडा, अडचणीत वाढ ; सद्यस्थितीत फक्त १५ ते २० हजार डोस शिल्लक

लसींचा पुन्हा तुटवडा भासू लागल्याने फक्त मोजक्याच लसीकरण केंद्रांवर बुधवारी लस दिली गेली. मुंबईत लसच उपलब्ध नसल्याची कबुली पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

    मुंबई : पालिकेकडून योग्य नियोजन होऊन देखील केवळ लसींच्या तुटवड्यामुळे मागील काही दिवसांपासून अडचणी वाढल्या आहेत. मुंबईत केवळ १५ ते २० हजार डोस शिल्लक असल्याने त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लसीकरण केंद्रांवर डोस दिले गेले नाहीत. मात्र शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे वॉक-इन लसीकरण कूपर, राजावाडी आणि कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आले आहे.

    लसींचा पुन्हा तुटवडा भासू लागल्याने फक्त मोजक्याच लसीकरण केंद्रांवर बुधवारी लस दिली गेली. मुंबईत लसच उपलब्ध नसल्याची कबुली पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

    त्यामुळे, फक्त ५२ केंद्रांवर सकाळी १ ते ३ या वेळात लसीकरण केले गेले. तर परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार असून यासाठी 300 डोसची सोय केली गेली असल्याचे सांगण्यात आले.

    मुंबईत सद्यस्थितीत फक्त १५ ते २० हजार डोस शिल्लक असून त्यांचे ही वितरण केले गेले आहे. किमान एक सेशन सुरू करण्यासाठी १० वायल्स लागतात. ज्यांच्याकडे फक्त ३ ते ४ वायल्स असतील ती केंद्र लसीकरण करु शकत नाही. त्यामुळे, पालिकेच्या खूप कमी केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे.

    डॉ. मंगल गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी,पालिका