corona virus vaccine

देशातील विविध शहरांच्या तुलनेत मुंबईत लसींचे वाया जाण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. लसींचा काटेकोर वापर केला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली. तर वाया जाणाऱ्या लसींचा प्रमाण 1 टक्क्या पेक्षाही म्हणजे 0.8 इतके असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली.

  मुंबई – जागतिक दर्जाचे शहर आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने लसीकरणात आघाडी घेतली आहे. गेल्या चार महिन्यांत 29 लाख लसीचे डोस मुंबईकरांना देण्यात आले. त्यात लसींचे वाया जाण्याचे प्रमाण 0.8 इतके अत्यल्प असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

  देशातील विविध शहरांच्या तुलनेत मुंबईत लसींचे वाया जाण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. लसींचा काटेकोर वापर केला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली. तर वाया जाणाऱ्या लसींचा प्रमाण 1 टक्क्या पेक्षाही म्हणजे 0.8 इतके असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली.

  मुंबई लसीकरणात आघाडीवर आहे. उपलब्ध असलेल्या लसींचा काटेकोर वापर होत आहे. पायाभूत सुविधा लसी साठवण्यासाठी अनुकूल वातावरण आणि लसीकरण करणारे प्रशिक्षित कामगार यांच्या मदतीने लसी वाया जाण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

  मुंबईत लसीकरण मोठ्या संख्येने होत आहे. यामुळे पालिकेने लसीकरणात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना एकूण 2 लाख 99 हजार 538 डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये 1 लाख 82 हजार 951 कर्मचाऱ्यांना पहिला, तर 1 लाख 16 हजार 587 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

  तसेच, फ्रंटलाईन वर्कर म्हणून 8 लाख कर्मचाऱ्यांची नोंद झाली होती. त्यापैकी 2 लाख 31 हजार 569 कर्मचाऱ्यांना पहिला, तर 1 लाख 25 हजार 991 दुसरा, असे एकूण 3 लाख 57 हजार 560 डोस देण्यात आले. 45 ते 49 वर्षांमधील 8 लाख 29 हजार 211 लाभार्थ्यांना पहिला, तर 3 लाख 39 हजार 578 दुसरा, अशा एकूण 11 लाख 68 हजार 789 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

  60 वर्षांवरील 8 लाख 82 हजार 554 लाभार्थ्यांना पहिला, तर 1 लाख 48 हजार 397 दुसरा, अशा एकूण 10 लाख 30 हजार 951 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर, 18 ते 44 वयोगटातील 72 हजार 919 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 45 ते 59 वर्षांमधील व 60 वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पालिका लसीकरणात आघाडीवर आहे.