कोरोनावर उपलब्ध असलेली लस ही पूर्णपणे सुरक्षित असून ती घेण्यास विलंब करू नका: मुख्यमंत्र्यांचे आवाहन

लसीकरणाचा पहिला डोस देण्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसरा डोस देण्याचे काम सुरू आहे. कोरोना लसीबाबत आजही लोकांच्या मनात संभ्रम आहे. ही लस सुरक्षित नसल्याचं काहीजणांचं म्हणणं आहे. यामुळे लोकांच्या मनाची दोलायमान स्थिती आहे. कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून विविध चाचण्यांद्वारे ती सुरक्षित असल्याचे शिक्कामोर्तबही तज्ञांनी केलेले आहे.  त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेली लस ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने ती टोचून घेण्यात विलंब करू नका.

    मुंबई : कोरोना महामारीचा रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य शासनाच्या आदेशाचे व नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. या संवादात त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यात एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. कोरोनाचे लसीकरण संपूर्ण राज्यात सुरू झाले आहे. यात आजवर आरोग्य विभाग आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे.

    लसीकरणाचा पहिला डोस देण्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसरा डोस देण्याचे काम सुरू आहे. कोरोना लसीबाबत आजही लोकांच्या मनात संभ्रम आहे. ही लस सुरक्षित नसल्याचं काहीजणांचं म्हणणं आहे. यामुळे लोकांच्या मनाची दोलायमान स्थिती आहे. कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून विविध चाचण्यांद्वारे ती सुरक्षित असल्याचे शिक्कामोर्तबही तज्ञांनी केलेले आहे.

    त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेली लस ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने ती टोचून घेण्यात विलंब करू नका. सर्वांनी ही लस घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आजमितीला जरी ही लस मर्यादित लोकांसाठी उपलब्ध असली तरी लवकरात लवकर ती सर्वसामान्य जनतेलाही उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

    आपल्याला जर कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर लस सर्वसामान्यांना मिळेपर्यंत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे तर आणि तरच आपण या कोरोनावर विजय प्राप्त करू शकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.