भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध समित्या स्थापणार– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्यात भारतीय स्वातंत्र्याचा (Indian Independence) अमृत महोत्सव (the Amrit Mahotsav) आयोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या (The Cabinet) बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) होते.

    मुंबई (Mumbai) : राज्यात भारतीय स्वातंत्र्याचा (Indian Independence) अमृत महोत्सव (the Amrit Mahotsav) आयोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या (The Cabinet) बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) होते. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत हा अमृत महोत्सव राज्यात आयोजित करण्यात येईल.  यासाठी विविध समित्या देखिल स्थापन करण्यात येत आहेत.

     या संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने आज एका सादरीकरणाद्धारे माहिती दिली. आज मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet meeting) याविषयी निर्णय घेण्यात आला.

    महोत्सवाची आखणी, नियोजन व प्रभावी अंमलबजावणी याकरिता राज्यस्तरीय समिती, कोअर समिती, अंमलबजावणी समिती, जिल्हास्तर समिती, पंचायत व ग्रामस्तर समिती अशा विविध समित्या स्थापन करण्यात येतील. सांस्कृतिक कार्य विभाग हा या महोत्सवाचे समन्वयन करेल. या विभागाच्या अधिपत्याखाली एकछत्र योजना तयार करण्यात येऊन विविध विभागांकडून प्रस्ताव प्राप्त करून घेण्यात येतील. त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील अंमलबजावणी समिती मंजुरी देईल.