Vasai raped by showing the lure of marriage The girl is 5 months pregnant The accused was handcuffed by the police in Telangana

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाºया आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. सदर कारवाई वसई रोड लोहमार्ग पोलिसांनी तेलंगणा राज्यात केली. आरोपीने वारंवार शरीरसंबंध ठेवल्याने तरुणी पाच महिन्यांची गरोदर राहिली. आरोपीला मुंबईत आणल्यावर न्यायालयात हजर केले असता १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे वसई लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

    मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाºया आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. सदर कारवाई वसई रोड लोहमार्ग पोलिसांनी तेलंगणा राज्यात केली. आरोपीने वारंवार शरीरसंबंध ठेवल्याने तरुणी पाच महिन्यांची गरोदर राहिली. आरोपीला मुंबईत आणल्यावर न्यायालयात हजर केले असता १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे वसई लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

    रेल्वेमध्ये फळे विकून २१ वर्षीय तरुणी कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होती. फळे विकताना डिसेंबर २०२० महिन्यात तरुणीची ओळख शेष प्रसाद ऊर्फ दीपू हिरालाल पांडे (वय २८, रा. गाव नेबुह पोस्ट- बडी हल्दी, रिवा, मध्य प्रदेश) याच्याशी झाली. पांडे हा रेल्वे स्थानकात हमालीचे काम करून वसई रोड स्थानकातच राहायचा. रोजच्या गाठीभेटीतून पांडे याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

    तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्तापित केले. लग्न करण्याच्या नावाखाली सतत शरीरसंबंध ठेवल्याने तरुणी गरोदर राहिली. पाच महिन्यांची गरोदर राहिल्याचे लक्षात येताच तरुणीचे कुटुुंबिय हादरले. पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी तात्काळ वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग लोहमार्ग पोलिसांना सांगितला. या प्रकरणी वसई रोड लोहमार्ग पोलिसांनी शेष प्रसाद ऊर्फ दीपू हिरालाल पांडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

    दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पांडे याने पळ काढला व मोबाईल क्रमांकही बंद केला. तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांचे पथक पांडे याच्या मूळगावी मध्य प्रदेश येथे दाखल झाले. मात्र वारंवार जागा बदलत असल्याने पांडेचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. असे असतानाही लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. वसई रोड लोहमार्ग पोलिसांनी उत्तमरीत्या तपास करून हाती लागलेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता पांडे हा तेलंगणा राज्यात असल्याचे लोहमार्ग पोलिसांना समजले. त्यानुसार वरिष्ठांची परवानगी घेऊ न लोहमार्ग पोलिसांचे पथक हैदराबादला रवाना झाले. वेशांतर करून लोेहमार्ग पोलिसांनी सलग तीन-चार दिवस सापळा लावून पांडेच्या मुसक्या आवळल्या.

    ही उत्तम कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे आयुक्त कैसर खालिद, लोहमार्ग पश्चिम परिमंडळचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लाहीगुडे, पोलीस नाईक बनकर, पोलीस अंमलदार शेख, पोलीस अंमलदार भुजबळ, महिला पोलीस अंमलदार कदम आदी पथकाने केली.