वसई, विरार, पालघर, ठाणे, कल्याण, घणसोली आणि… म्हाडाच्या घरांचे फॉर्म निघाले; इथे मिळेल सर्व महिती

एका घरासाठी अडीचशे लोकांचे अर्ज येत आहेत. वसई, विरार, मीरा रोड, पालघर, ठाणे, कल्याण, घणसोली, टिटवाळासह सिंधुदूर्गमध्ये म्हाडाचे फ्लॅट असणार आहेत. अत्यल्प, अल्प आणि मध्य उत्पन्नगटासाठी हे फ्लॅट उपलब्ध केले जाणार आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या फ्लॅटच्या किंमती दहा लाखांच्या पुढे आहेत.

  मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या लॉटरीचे अर्ज उपलब्ध झाले आहेत. या सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून अर्जांची नोंदणी सुरू झाल्यानंतर पहिल्या एक तासातच तीन हजार अर्जांची विक्री झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी दिली.

  एका घरासाठी अडीचशे लोकांचे अर्ज येत आहेत. वसई, विरार, मीरा रोड, पालघर, ठाणे, कल्याण, घणसोली, टिटवाळासह सिंधुदूर्गमध्ये म्हाडाचे फ्लॅट असणार आहेत. अत्यल्प, अल्प आणि मध्य उत्पन्नगटासाठी हे फ्लॅट उपलब्ध केले जाणार आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या फ्लॅटच्या किंमती दहा लाखांच्या पुढे आहेत.

  पुढील २-३ वर्षांमध्ये साधारणत: २५ हजार घरे उपलब्ध होणार असल्यामुळे बांधकाम उद्योगातील विविध घटकांना रोजगार उपलब्ध होईल. इमारतींमधील मूळ सभासदांना १०० ते १५० फुट अधिकच्या चटईक्षेत्रफळाची घरे प्राप्त होत असल्यामुळे त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावेल.
  रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा खर्च वाढल्यामुळे प्रकल्प आर्थिकदृष्टया वर्धनक्षम होत नसल्यामुळे अनेक सभासदांना घरांचा ताबा वेळेवर मिळणे शक्य नव्हते. या संस्थांच्या विकासकांनी सदर योजनेचा फायदा घेतल्यामुळे प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यतेत सुधारणा झाल्यामुळे सभासदांना घरांचा ताबा वेळेवर मिळेल.

  शासनाने अधिमुल्यात दिलेल्या सवलतीमुळे म्हाडाकडे जमा झालेल्या महसूलाचा वापर हा म्हाडामार्फत सुरु असलेल्या बी.डी.डी.वसाहतींच्या पुनर्विकासासारख्या प्रकल्पांकरीता वापरणे शक्य होईल असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

  झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या सद्यस्थितीबद्दलही गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी माहिती दिली.सन २०१९-२० या वर्षात ८ हजार ६०२ सदनिका,सन २०२०-२१ मध्ये १३ हजार ८७५ सदनिका तर एप्रिल २०२१ नंतर आजपर्यंत ५ हजार ६८५ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे व ९२ हजार लोकांना याचा फायदा झालेला आहे .

  म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मिळून ज्या गतीने काम करीत आहेत त्यामुळे तसेच इज ऑफ डूइंग बिझनेस मुळे प्रचंड फायदा झाला आहे.गृहनिर्माण विभागांतर्गत फाईलींचा गतिमान प्रवास होत असून त्यामुळे उद्योग जगतात उत्साह संचारला आहे असेही मंत्री डॉ.आव्हाड यांनी सांगितले.

  म्हाडाच्या लॉटरीचा अर्ज भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]