दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं, षण्मुखानंद हॉलमध्ये होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

कोरोनाचं संकट जरासे ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.

    शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली असून यंदाचा मेळावा हा सायनच्या (शीव) षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. या मेळाव्यात 50 टक्के उपस्थिती असणार असून यामध्ये सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

    संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील”.

    कोरोनाचं संकट जरासे ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सेनेचा पहिलाच दसरा मेळावा गतवर्षी पार पडला. परंतु या मेळाव्यावर कोरोनाचं सावट होतं. याचमुळे शिवतीर्थावरची भव्य सभा टाळून सेनेचे मोजके नेते, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला होता. शिवसैनिकांसाठी हा मेळावा ऑनलाईन देखील दाखविण्यात आला होता. याच मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला सारुन उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण करताना भाजपवर आसूड ओढले होते.