ग्रामपंचायत विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांत शाब्दिक चकमक, अधिवेशनावर बहिष्कर

तसेच हसन मुश्रीफ यांना ग्रामपंचायत प्रशासक नेमण्याची घाई झाली आहे. परंतु आम्ही नियमबाह्य पद्धतीने ते होऊ देणार नाही. अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात प्रचंड गोंधळ झाली आहे. यामध्ये ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर या गोंधळात ग्रामपंचायत विधेयक मंजूर केला. त्यानंतर तात्काळ विरोधकांनी अधिवेशनावर बहिष्कार टाकत सभात्याग केला आहे.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पटलावर मांडलेल्या ग्रामपंचायत सुधारणा विधेयकांवर आक्षेप घेतला. फडणवीस म्हणाले, कोर्टाने जो निर्णय दिला आहे. त्यानुसार याचि नियुक्ती करावी. तसेच कोर्टात सुनावणी असताना हे विधेयक आणू नका, राज्य सरकार कोर्टाच्या विरोधात भूमिका घेत आहे.

तसेच हसन मुश्रीफ यांना ग्रामपंचायत प्रशासक नेमण्याची घाई झाली आहे. परंतु आम्ही नियमबाह्य पद्धतीने ते होऊ देणार नाही. अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. यावर अजित पवार यांनी म्हटले की, हे बिल वेगळ आहे, कोर्टात निकाल लागला तर तो पाळला जाईल, विरोधी पक्षांनी याची गल्लत करु नये.

यावर संख्याबळाच्या आधारावर विधेयक रेटण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. हे चुकीचे आहे आणि आम्ही ते सहन करणार नाही. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत प्रशासक नेमण्याच्या विधेयकावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे.