Vertical split in BJP; A large group supporting Khadse joined Shiv Sena

मार्च महिन्याच्या अखेरीस जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता संपुष्टात आणून शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला होता. यात थेट भाजपमध्ये उभी फूट पडून एक मोठा गट शिवसेनेत दाखल झाला होता. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच मुक्ताईनगरातही हाच पॅटर्न राबविण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. यामुळे महापालिकेच्या पाठोपाठ मुक्ताईनगर नगरपंचायतीतही झालेले सत्तांतर हे शिवसेनेची ताकद वाढविणारे ठरले आहे. यामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार चंद्रकांत पाटील यांनी अचूकपणे लक्ष्यभेद केल्याचे स्पष्ट झाले आहे.

    मुंबई : मार्च महिन्याच्या अखेरीस जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता संपुष्टात आणून शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला होता. यात थेट भाजपमध्ये उभी फूट पडून एक मोठा गट शिवसेनेत दाखल झाला होता. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच मुक्ताईनगरातही हाच पॅटर्न राबविण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. यामुळे महापालिकेच्या पाठोपाठ मुक्ताईनगर नगरपंचायतीतही झालेले सत्तांतर हे शिवसेनेची ताकद वाढविणारे ठरले आहे. यामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार चंद्रकांत पाटील यांनी अचूकपणे लक्ष्यभेद केल्याचे स्पष्ट झाले आहे.

    जळगाव आणि मुक्ताईनगरच्या पाठोपाठ आता जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील हाच पॅटर्न राबविण्यात येणार असल्याच्या चर्चेला जोर चढला आहे. यात भुसावळ नगरपालिकेत आधीच शिवसेनेने चाचपणी केली असून तेथून नगरसेवकांचा मोठा गट हा शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.

    तर, जिल्हा परिषदेतही मध्यंतरी सत्तांतराचे वारे वाहू लागल्याचे दिसून आले होते. याची चर्चा सध्या थंडावली असली तरी मुक्ताईनगरातील सत्तांतरामुळे जिल्हा परिषदेतही सत्तांतर होणार का याकडे आता लक्ष लागले आहे.

    जळगावात एकनाथ खडसेंची पावर संपली

    शिवसेनेत प्रवेश करणारे नगरसेवक माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
    मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. यात नजमा तडवी या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या असून यासोबत भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले होते. हे सर्व नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत.

    एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही येथील नगराध्यक्षा व इतर नगरसेवकांनी पक्षांतर केले नव्हते. अर्थात, ते खडसे समर्थक म्हणूनच ओळखले जात होते. यातील सहा नगरसेवकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.