महापालिकेच्या कामांची अशीही “शाळा”

एकावेळेस हा अधिकारी सर्व ठिकाणी उपस्थित राहणे शक्यच नसल्यानं ठेकेदारांना निकृष्ट काम करणं सोपे होऊन जाते, असे माहिती अधिकार कार्यकर्ते नवनाथ चव्हाण सांगतात.

  मुंबई: मुंबईत पालिकेच्या पायाभूत सुविधांचा पायाही कसा अनियमित कामांवर उभा आहे हे समोर आले आहे. पालिकेचे अधिकारी हे सर्वशक्तिमान असल्याप्रमाणे पालिकेने एका वेळेस एकाच अधिकाऱ्याला वेगवेगळ्या प्रभागांतील १० कामे एकाचवेळेस देखरेखीसाठी दिल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. विशेष म्हणजे हा अधिकारी या विभागात एकाच पदावर गेल्या दहा वर्षापासून कार्य़रत आहे. दोन वेळा बदली आदेश आल्यानंतर ते कसे परस्पर थांबवले गेले याची आपल्याला माहिती नसल्याचे हा अधिकारी सांगतो. शाळा दुरूस्ती पायाभूत सुविधा विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदारांच्या वरदहस्तानेच हे सुरू असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते करत आहेत.

  दुय्यम अभियता संजय काळे पांनी यरिष्ठांची मर्जी सांभाळून आणि ठेकेदाराशी संगनमत करून कोट्यवधींची कामे केली. ‘‘ठेकोदारा’’शी संगनमत करून २०१८-१९ मध्ये संजय काळे यांच्या देखरेखीमध्ये जयळजवळ ७ कामे ४० कोटी रुपयांची तसेच २०१९-२०मध्ये (१० कामे ८0 कोटी अशाप्रकारे २०१८ ते २०२० पर्यंत दुय्यम अभियंता सजय काळे यांच्या देखरेखीखाली १७ शाळांच्या दुरूस्तीची एकूण १२० कोटी रूपयांची कामे करण्यात आली. वास्तविक एकावेळेस हा अधिकारी सर्व ठिकाणी उपस्थित राहणे शक्यच नसल्यानं ठेकेदारांना निकृष्ट काम करणं सोपे होऊन जाते, असे माहिती अधिकार कार्यकर्ते नवनाथ चव्हाण सांगतात.

  दरम्यान, सदर कामांची खातेनिहाय चौकशी होणे आवश्यक आहे .यासंदर्भात आपण तक्रार करूनही पालिकेने दखल घेतली नाही, तसेच सदर अधिकाऱ्याला वाचवण्याचे काम त्यांचे वरिष्ठ का करीत आहेत यातच सर्व काही आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदार नवनाथ चव्हाण यांनी केला आहे.

  दुय्यम अधियंता संजय काळे यांच्या देखरेखीखाली सन २०१९-२० मध्ये सुरू असलेली कामे :

  पी दक्षिण.,आर दक्षिण, पी उत्तर, के पश्चिम , झोन ४ आणि झोन ७ याठिकाणी एकच वेळेस दहा कामे सुरू आहेत. संजय काळे हे ठेकेदारांच्या माध्यमातुन यरिष्ठ अधिका-यांसोबत आर्थिक देवाणघेवाण करून स्वतःची नियुक्ती करून घेतात . त्यामुळे ठेकेदारांचे फावते आणि ठेकेदार मोठ्या प्रमाणात बिनधास्त निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत, हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? काळे यांची बदली का होत नाही, अशी चर्चा पालिका वतुर्ळात आहे.

  यासंदर्भात विचारणा करण्यासाठी संजय काळे यांना संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. तर त्याचे वरिष्ठ मिटकर यांनीही बोलण्यास असमर्थता दर्शवली.