कोविड-१९ सॅम्पल कलेक्‍शनसाठी व्‍हीएफएस ग्‍लोबलकडून विशेष सेवेचा शुभारंभ

व्‍हीएफएस ग्‍लोबलकडून प्रमाणित वैद्यकीय प्रयोगशाळांसोबत कोविड-१९ सॅम्पल कलेक्‍शनसाठी ऑनलाइन अपॉइण्‍टमेंट बुकिंग सेवेचा १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला.

मुंबई : सीमांपलीकडील प्रवास पुन्‍हा सुरू होण्‍यासोबत प्रवासावरील निर्बंध हळूहळू शिथिल करण्‍यात येत असताना काही देशांनी निर्गमनापूर्वी सोईस्‍करपणे व विश्‍वसनीयरित्‍या कोविड-१९ चाचणी करणे अनिवार्य केले आहे. तसेच काही देशांनी आगमनानंतर चाचणी करण्‍याची प्रक्रिया सुलभ करण्‍यासाठी सर्व येणा-या प्रवाशांसाठी त्‍याची अंमलबजावणी केली आहे.
या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी आणि अतिरिक्‍त सेवा देण्‍याचा भाग म्‍हणून व्‍हीएफएस ग्‍लोबलने मुंबई, दिल्‍ली व कोचीमध्‍ये कोविड-१९ आरटी-पीसीआर सॅम्‍पल कलेक्‍शनसाठी ऑनलाइन अपॉइण्‍टमेंट बुकिंग सेवा सुरू केली आहे.

मुंबई, दिल्‍ली व कोची मधील ग्राहक व्‍हीएफएस ग्‍लोबल वेबसाइटवर (https://www.vfsglobal.com/en/individuals/indiacovidtest.html) अपॉइण्‍टमेंट्स बुक करू शकतात आणि १५ ऑगस्‍ट २०२० पासून नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या सहयोगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्‍ये नमुने देऊ शकतात.

या सेवेबाबत बोलताना दक्षिण आशिया, मध्‍य पूर्व व उत्तर आफ्रिका व अमेरिकेमधील प्रादेशिक समूह सीओओ विनय मल्‍होत्रा म्‍हणाले, ”आमचा विश्‍वास आहे की, सोईस्‍कर व विश्‍वसनीय प्री-डिपार्चर कोविड-१९ नमुना कलेक्‍शन/चाचणी सोल्‍यूशन गंतव्‍य देश, विमानसेवांना खात्री देत आणि जोखीम दूर करणारे प्रमुख स्रोत बनत आंतरराष्‍ट्रीय प्रवासाच्‍या रिकव्‍हरी प्रक्रियेमधील उत्‍प्रेरक बनू शकते. काही देश आगमनानंतर चाचणी करण्‍याचा दबाव सुलभ करण्‍यासाठी येणा-या प्रवाशांसाठी ही प्रक्रिया अनिवार्य करू शकतात.” 

कोविड-१९ सॅम्पल कलेक्‍शन सेवेचा व्हिसा अप्‍लीकेशन सबमिशन प्रक्रियेशी कोणताच संबंध नाही आणि व्‍हीएफएस ग्‍लोबल व्हिसा अप्‍लीकेशन प्रक्रिया किंवा व्हिसा निर्णयावर कोणताच प्रभाव नाही. ही सेवा संबंधित सरकारच्‍या निर्णयाप्रमाणे दिली जाते. ग्राहकांना आंतरराष्‍ट्रीय प्रवासावरील माहितीसाठी गंतव्‍य देशामधील प्रवासासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचनांची पाहणी करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात येत आहे.