अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची विद्यार्थी भारतीची मागणी पूर्ण

कल्याण : अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा विषय गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी भारती ने लावून धरला होता. विद्यार्थी भारतीच्या मागणीने अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द

कल्याण : अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा विषय गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी भारती ने लावून धरला होता. विद्यार्थी भारतीच्या मागणीने अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांचे आभार मानले असून १००  वर्षातील अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आला आहे.  ह्या निर्णयात कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच ज्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळवायचे आहेत त्यांचा देखील इथे विचार केला गेला असल्याचे राज्याध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले.

तसेच विद्यार्थी भारतीच्या मागणीने कोरोनाच्या महाभयंकर काळात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी देखील पूर्ण केल्या बद्दल सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचेही आभार राज्यकार्याध्यक्ष प्रणय घरत यांनी मानले