Mumbai's endless beach can be seen from the 'Viewing Gallery' on Dadar Chowpatty

मुंबई महापालिकेतर्फे दादर चौपाटीवर उभारल्या जात असलेल्या व्हुईंग गॅलरीला आरपीआयने विरोध केला आहे. बुधवारी या गॅलरीविरोधात निदर्शने करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात काही कार्यकर्ते जमले होते. मात्र याप्रकरणी शुक्रवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

    मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे दादर चौपाटीवर उभारल्या जात असलेल्या व्हुईंग गॅलरीला आरपीआयने विरोध केला आहे. बुधवारी या गॅलरीविरोधात निदर्शने करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात काही कार्यकर्ते जमले होते. मात्र याप्रकरणी शुक्रवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

    पालिकेतर्फे दादर चौपाटीवरील सांडपाणी वाहून नेणार्या जुन्या आऊटलेटवर व्हुईंग गॅलरी उभारली जात आहे. हा आऊटलेट खूप जुना असून मोडकळीस आला आहे. त्यावर चौपाटीला येणारे पर्यटक जाऊन बसतात. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. पालिकेने या ठिकाणी व्हुईंग गॅलरी उभारण्याचे ठरवले आहे. त्याचे काम सुरू झाले असून येत्या काही दिवसात ते पूर्ण होणार आहे. ही गॅलरी प्रेमी युगलांचा सेल्फी पाॅइंट होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने याला विरोध करण्यात आला आहे.

    दरम्यान ‘ही व्हुईंग गॅलरी असून प्रेमी युगुलांचा सेल्फी पाॅइंट नाही. या गॅलरीतून समुद्राचा नजारा टिपता येणार आहे तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन घेता येईल. आऊटलेट अतिशय जुना झाला असून तो तसाच ठेवला तर अपघात होऊ शकतात. त्यामुळे त्यावर व्हुईंग गॅलरी बांधली जाते आहे. ही गॅलरी सुरक्षित असून ती चैत्यभूमीपासून शंभर ते दोनशे मीटर दुर आहे. गॅलरीमुळे परिसराला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.