ना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कामगार मंत्री मुश्रीफ यांच्याकडे बैठक घेण्याची विनंती केली होती या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत वडेट्टीवार यांनी सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना परिपत्रकाचा आधार घेऊन अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत आहे. वाढती महागाई व कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

  मुंबई: सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योग यातील कामगारांना किमान समान वेतन लागू केलेली असल्याने सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना अल्प वेतन मिळत आहे. त्यामुळे या परिपत्रकात बदल करून किमान वेतन यादीमध्ये दुरूस्ती करावे व सिमेंट उद्योगातील कामगारांना एकवीस हजार रूपये किमान वेतन वाढ देण्यात यावी अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात आज झालेल्या बैठकीत केली.

  मंत्री.श्री. वडेट्टीवार यांची मागणी लक्षात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्या परिपत्रकात बदल करून सिमेंट कामगारांना किमान वेतन लागू करणारे परिपत्रक काढून त्यात काम करणाऱ्या कामगारांना २१ हजार रुपये किमान वेतन लागू करण्याचा तत्वतः मान्य करण्यात येत असल्याचे सांगितले

  मंत्रालयातील कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या दालनात सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतन वाढ व किमान वेतन परिपत्रकात दुरूस्ती करून कामगारांना किमान नवीन वेतन श्रेणी लागू करण्यासाठी ही बैठक पार पडली.यावेळी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार,कामगार विभागाच्या प्रधानसचिव विनिता सिंगल, कामगार आयुक्त श्री.कल्याणकर व इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

  मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले,वाढती महागाई लक्षात घेता श्रमीकांना किमान जीवन जगताना अडचणी येत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड सिमेंट, एसीसी सिमेंट , अबूजा सिमेंट, दालमिया सिमेंट हे पाच सिमेंट उद्योग असून या मध्ये किमान 15 ते 20 हजार कामगार काम करीत आहे.

  सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना समान किमान वेतन लागू करण्याचा परिपत्रक लागू करण्यात आले आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन सिमेंट उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत असल्याची बाब विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेनि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देऊन माहिती दिली. तसेच कामगारांना किमान २१ हजार रुपये वेतन देण्यात यावी अशी मागणी केली.

  यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार, विजय ठाकरे, किशोर भोयर, नारोटतं बाराई, सुधाकर तेजाने, गौतम भासरकर, सुनील धावस, दशरथ राऊत हे उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी तातडीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बैठक लावून हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात येईल असे आश्वासन मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिले.

  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कामगार मंत्री मुश्रीफ यांच्याकडे बैठक घेण्याची विनंती केली होती या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत वडेट्टीवार यांनी सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना परिपत्रकाचा आधार घेऊन अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत आहे. वाढती महागाई व कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

  त्यामुळे कामगारांचे किमान वेतन वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी सिमेंट व सिमेंटवर आधारित उद्योग यातील काम करणाऱ्या कामगारांना लागू करण्यात आलेल्या समान किमान वेतन परिपत्रकात बदल करून सिमेंट उद्योगतील कामगार याना नवीन वेतन श्रेणी लागू करणे, 21 हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

  किमान वेतन समितीसमोर सिमेंट उद्योगातील ठेका श्रमीकांबाबतचा विषय सादर करावा:-

  कामगार मंत्री हसन मुश्रीफ कामगारांना कोणत्याही परिस्थीतीत पुरेसे किमान वेतन मिळणे आवश्यक आहे.सध्या कोरोनामुळे कामगार वर्ग अडचणीत आहे. त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.

  सिमेंट उद्योगातील ठेका श्रमीकांबाबत किमान वेतन समितीसमोर वेतन वाढीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यवाही करावी असे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.यावेळी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विविध संघटनांच्या मागण्या आलेली सविस्तर श्रमीक संघटनांच्या मागण्यांची माहितीबाबतही सर्व चर्चा केली.