विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन हातभट्टीचा धंदा टाकावा; भाजपच्या ‘या’ नेत्याची घणाघाती टीका

विजय वडेट्टीवार हे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आहेत. काय भाषा, काय विचार? विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन हातभट्टीचा धंदा टाकावा, अशी घणाघाती टीका आता आमदार राम सातपुते यांनी केली आहे.

  मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि महाविकास आघाडी सरकारमधील मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात सध्या चांगलाच वाद सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं सरकार असताना दारूबंदी केली होती. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी ती दारूबंदी उठवली. त्यावरून वडेट्टीवार यांच्यावर भाजप नेते सातत्याने टीका करताना दिसतात.

  दरम्यान अशातच आता विजय वडेट्टीवार आणि पडळकर यांच्या वादात भाजप आमदार राम सातपुते यांनी उडी घेतली आहे. गोपीचंद पडळकरांने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना एका बापाची ओलाद असेल तर माझ्याविरोधातील आरोप सिद्ध करून दाखवा, असं आव्हान विजय वडेट्टीवार यांनी पडळकरांना दिलं होतं.

  वडेट्टीवारांनी राजीनामा देऊन हातभट्टीचा धंदा टाकावा

  विजय वडेट्टीवार हे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आहेत. काय भाषा, काय विचार? विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन हातभट्टीचा धंदा टाकावा, अशी घणाघाती टीका आता आमदार राम सातपुते यांनी केली आहे.

  गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?

  आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर छत्तीसगड येथे दारूची फॅक्टरी असल्याचा आरोप केला होता. आपल्या स्वकियांसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन चंद्रपुरातील दारूबंदी उठवली, असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.

  दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी पुराव्याशिवाय आरोप करू नयेत. ते आमदार झाले असून आता कार्यकर्ते राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी एखाद्या मंत्र्यावर आरोप करतांना जबाबदारीने बोलायला हवं, असं विजय वडेट्टीवार त्यावेळी म्हणाले होते.