विक्रोळी – भांडुपला रेल्वेगाडी थांबण्यासाठी युवा सेनेचे रेल्वे प्रशासनाकडे निवेदन

मुंबई - अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल तीन महिन्यानंतर १५ जून पासून पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर रेल्वे सेवा सुरु झाली आहे. सध्या या तिन्ही मार्गांवर प्रत्येकी साधारण

 मुंबई – अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल तीन महिन्यानंतर  १५ जून पासून पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर  रेल्वे सेवा सुरु झाली आहे. सध्या या तिन्ही मार्गांवर प्रत्येकी साधारण १३० फेऱ्या धावत आहेत. मात्र या पैकी सध्या मध्य रेल्वेच्या गाड्या मुलुंड नंतर थेट घाटकोपरला थांबतात. वास्तविक नाहूर, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी याठिकाणी अत्यावश्यक सेवेत काम करणारे अनेक कर्मचारी(कोरोना योद्धा ) आहेत. परंतु वरील पैकी कुठल्याही  स्थानकात गाडी थांबत नसल्याने अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांना  मनस्ताप सहन करावा लागत असून रेल्वेने सुरु केलेल्या रेल्वे फेऱ्यांचा त्यांना  काहीच  फायदा मिळताना दिसत नाही. 

तेव्हा राष्ट्रकर्तव्य प्रथम मानणाऱ्या या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होऊ नये यासाठी भांडुप -विक्रोळी स्थानकात रेल्वे गाडी थांबवन्याबाबतचे निवेदन  विक्रोळी विधानसभेतील युवा सेना सहसचिव योगेश पेडणेकर यांनी मध्य रेल्वेच्या रेल प्रबंधक कार्यालयातील अधिकारी (  D.R.M) श्री शलभ गोयल यांना दिले आहे. रेल्वे प्रशासन या निवेदनाचा विचार जरून योग्य तो निर्णय  लवकर घेईल अशी अपेक्षा पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.