विक्रोळी,कांजूरमार्ग,भांडूपमधील काही परिसर ७ दिवसांसाठी लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा राहणार सुरु

मुंबई:कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणणे व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचबरोबर नागरिकांच्या गर्दीमुळे होणारे संभाव्य धोका लक्षात घेता विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुपमधील परिसरात

 मुंबई:कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणणे व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचबरोबर नागरिकांच्या गर्दीमुळे होणारे संभाव्य धोका लक्षात घेता विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुपमधील परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता ७ दिवस सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश सहाय्यक आयुक्त एस विभागाकडून देण्यात आला आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग हा दिवसेंदिवस सर्वत्र वाढताना दिसत आहे. विक्रोळी पूर्वेला असलेल्या कन्नमवार नगर व टागोरनगर परिसरात गेल्या २४ तासांमध्ये ४० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतदेखील आता दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे तसेच कांजूरमार्ग,भांडूपमध्येदेखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याने पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून विक्रोळी पुर्वमधील काही परिसर-कन्नमवार नगर व टागोरनगर मधील संपूर्ण परिसर,कांजूरमार्गमधील काही परिसर -कंजूर व्हिलेज रोड, अशोक नगर रोड, हरियाली व्हिलेज कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन संपूर्ण परिसर,भांडूपमधील काही परिसर-भट्टीपाडा मार्ग, गाढव नाका, टेंभीपाडा, प्रतापनगर रोड हे सर्व परिसर पुढील ७ दिवस बंद ठे‌वण्याचा आदेश देण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने मात्र सुरु राहतील, असा आदेश सहाय्यक आयुक्त एस विभागाकडून देण्यात आला आहे.