विक्रोळीत मोफत धान्य घेण्यासाठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

विक्रोळी: कोरोना व्हायरसचा प्रसार हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून व राज्य सरकारकडून प्रयत्न देखील सुरू आहेत परंतु लॉकडाउन मुळे गोरगरीब गरजून

 विक्रोळी: कोरोना व्हायरसचा प्रसार हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून व राज्य सरकारकडून प्रयत्न देखील सुरू आहेत परंतु लॉकडाउन मुळे गोरगरीब गरजून वरती आर्थिक संकट देखील ओढावले आहे. त्यामुळे संस्था,मंडळे,राजकीय नेतेदेखील पुढे सरसावलेले दिसत आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी मोफत मिळणाऱ्या धान्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा झालेले दिसत आहे. असाच काहीसा प्रकार हा विक्रोळीमधील कन्नमवार नगर परिसरात घडला आहे. मोफत मिळणाऱ्या धान्यसाठी गरजू आणि गरीब नागरिकांनी गर्दी केली होती. यात कुठल्याही प्रकारच्या सोशल डिस्टन्सिंगचे  पालन करताना नागरिक दिसले नाही. त्यामुळे नागरिकांना कोरोना व्हायरसचे भय राहिले आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण त्यातच  आपल्या विभागातच कोरोना रुग्णांची संख्या ही वाढताना दिसत आहे त्यातच काही कोरोना रुग्ण हे बरे होहून घरी सुद्धा परतले आहे परतलेल्या रुगणांची रहिवासी यांच्याकडून टाळ्या वाजवून सत्कार देखील करण्यात येत आहेत. त्यात पोलीस वारंवार आवाहन देखील करत आहेत. मात्र पोलिसांच्या आवाहनाकडे नागरिक पाठ फिरवत आहेत, असे आता चित्र विक्रोळीतदेखील दिसत आहे.