विनायक मेटेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वत:कडे पाहावे; वडेट्टीवारांचे  प्रत्युत्तर

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री व कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप केला. विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. पण मुख्यमंत्री फक्त बघत बसतात, असा घणाघात विनायक मेटे यांनी केला. दरम्यान मेटेंच्या या टीकेला आता विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

    विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

    विनायक मेटे यांना वाटेल ते बरळण्याचा अधिकार आहे. जातीयवादी कोण आहे हे राज्यातील जनतेला मेटेंच्या मागील दोन-तीन वर्षाच्या वक्तव्यातून दिसून येते असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

    तसेचं विनायक मेटे यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वत:कडे पाहावे. मार्गासवर्ग मंडळं त्या-त्या समाजासाठी, भटक्‍या विमुक्तांसाठी काम करत असतात. विनायक मेटे यांनी वेगळा चष्मा लावला आहे. ज्याला कोणताही आधार नाही असे ते बरळत असतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी मेटेंना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, विनायक मेटे यांनी वडेट्टीवार हे जातीयवादी माणूस असल्याचा गंभीर आरोप केला आहे.