शिवस्मारकाचं काम वेळेत सुरू करा, अन्यथा..; विनायक मेटेंचा इशारा

ऑफिसला गळती लागली आहे. पडझड सुरू आहे. कार्यालयात काहीच शिल्लक राहिलं नाही. हे कार्यालय सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विभागाचे प्रमुख आहेत. मात्र, त्यांचंच या कार्यालयाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.

    मुंबई: कुलाब्यातील शिवस्मारकाच्या ऑफिसला गळती लागली असून त्याची दुरावस्था झाली आहे. त्यावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.

    विनायक मेटे यांनी आज कुलाबा कफ परेड येथे जाऊन शिवस्मारकाच्या कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सरकारला हा इशारा दिला. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या ऑफिसची आघाडी सरकारमुळे दुरावस्था झाली आहे. दीड वर्षात आघाडीचा एकही नेता या ऑफिसची पाहणी करण्यासाठी फिरकला नाही.