छेडा नगर जिमखाना येथे लग्न सोहळ्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागल्याने राज्य साकारू व पालिकेने कोरोना नियमाची कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नियम धाब्यावर बसवणा-या विरोधात धाडी टाकून कारवाईला सुरुवात केली आहे. रविवारी चेंबूर (प) येथील छेडानगर जिमखाना येथे परवानगी न घेता लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता.

  • जिमखाना व्यवस्थापक आणि वर-वधूच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई (Mumbai).  मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागल्याने राज्य साकारू व पालिकेने कोरोना नियमाची कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नियम धाब्यावर बसवणा-या विरोधात धाडी टाकून कारवाईला सुरुवात केली आहे. रविवारी चेंबूर (प) येथील छेडानगर जिमखाना येथे परवानगी न घेता लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच तीनशेहून अधिक नागरिकांची गर्दी जमवणे शिवाय कोरोना नियम धाब्यावर बसवल्याने पालिकेने वर -वधूच्या पालकांच्या व जिमखाना व्यवस्थापकाविरोधात टिळक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यात कोरोना नियमाचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे. ५० पेक्षा अधिक लोकांची गर्दी जमवणे, मास्कचा वापर न करणे तसेच सोशल डिस्टनसिंगचा नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या चेंबूर ( प.) येथील विभाग कार्यालयाने छेडानगर जिमखाना येथे रविवारी रात्री पालिकेने धाडी टाकून संबंधितांवर कारवाई केली.

यावेळी, विना परवानगी लग्न करणे, लग्नात नियमांचे उल्लंघन करून ३००-३५० नागरिकांची गर्दी जमविणे, सामाजिक अंतर न राखणे, मास्कचा नीटपणे वापर न करणे आदी कारणास्तव आयोजक व जिमखाना व्यवस्थापक यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पालिकेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, छेडानगर जिमखाना अँड रिक्रिएशन सेंटर, चेंबूर येथे रविवारी रात्रीच्या सुमारास विना परवानगी लग्न सुरू असल्याची व तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची खबर चेंबूर ( प.) विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय अधिकारी भुपेंद्र पाटील यांना मिळाली व त्यांनी संबंधितांना सदर ठिकाणी भेट देऊन संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

पालिकेच्या कनिष्ठ अभियंता प्रकाश सोनवणे, चंद्रशेखर सिंग, निखिल जाधव एन. डी. घनकचरा, विशाल शिरपूरम सुपरवायझर, प्रतिक ठोकळे मार्शल अशा ५ जणांनी छेडानगर जिमखाना यक ठिकाणी रविवारी रात्री ९.१० वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकली. त्यावेळी त्यांना जिमखान्याच्या ठिकाणी ३०० – ३५० जणांची गर्दी आढळून आली. कोरोना संदर्भातील नियमांचे तीनतेरा वाजल्याचे निदर्शनास आले. यावेळी अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. गर्दीमुळे सामाजिक अंतर राखण्याचे भानही कोणाला नसल्याचे दिसून आले. कोरोना नियमाचे पालन न केल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नियमानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.