Violation of the quarantine rules will result in criminal charges; The solution is even tougher

काेराेना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा गेल्या काही दिवसात एक हजारावर गेल्याने प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना अधिकाधिक कठोर केल्या आहेत. दाट वस्ती आणि झोपडपट्टय़ा यांच्या तुलनेत रहिवासी इमारतीमधील रुग्ण संख्येचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिबंधित इमारतीमधील उपाययोजना अतिशय कठोर केल्या जात आहेत.

    मुंबई : गेल्या दोन महिन्यांतील एकूण रुग्ण संख्येच्या सुमारे ९० टक्के रुग्ण रहिवासी इमारतींमधील असून नियम मोडणाऱ्यांची माहिती गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला कळविण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. घरातील रुग्ण आणि त्यावच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वतंत्र खाेली आणि स्वतंत्र प्रसाधन गृहाचा वापर करणे आवश्यक आहे. तशी साेय नसल्यास रुग्णाला विलगीकरण केंद्रात हलविण्यात येईल असा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

    काेराेना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा गेल्या काही दिवसात एक हजारावर गेल्याने प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना अधिकाधिक कठोर केल्या आहेत. दाट वस्ती आणि झोपडपट्टय़ा यांच्या तुलनेत रहिवासी इमारतीमधील रुग्ण संख्येचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिबंधित इमारतीमधील उपाययोजना अतिशय कठोर केल्या जात आहेत.

    गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातील एकूण रुग्ण संख्या पाहता सुमारे ९० टक्के रुग्ण हे रहिवासी इमारतीमधील आहेत. ही बाब लक्षात घेता, गृह विलगीकरणासह कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांनी प्रशासनाला कळवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही प्रशासनाने सर्व विभाग कार्यालयाना दिले आहेत.