फॅन्सच्या प्रश्नावर विराट कोहलीने ‘हृदय’ जिंकणारं दिलं हे उत्तर…

एका फॅन्सने विराटला कोड्यात टाकणारा प्रश्न विचारला. तुझं आणि माहीचं नातं केवळ दोन शब्दात सांग, असा अडचणीचा प्रश्न फॅन्सने विचारला खरा पण विराटने देखील तितक्याच खऱ्या मनाने उत्तर दिलं. ‘माझं आणि माहीचं नातं म्हणजे विश्वास आणि आदर…’ असं हृदय जिंकणारं उत्तर विराटने दिलं आहे.

    मुंबई : भारतीय क्रिकेट संघासाठी इथून पुढचे काही दिवस महत्त्वाचे असणार आहेत. बीसीसीआयने आयपीएल संदर्भातील उर्वरित सामने यूएईमध्ये खेळविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात उर्वरित 31 सामने पार पडणार आहे. तत्पूर्वी भारताला इंग्लंड दौऱ्यावर महत्त्वपूर्ण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तसंच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे.

    दरम्यान त्यासाठी भारतीय संघातले सगळे खेळाडू कोरोनाच्या नियम आणि अटींना अधिन राहून मुंबईत क्वारंटाईन आहे. याचदरम्यान कर्णधार विराट कोहलीला चाहत्याने इन्स्टाग्रामवरुन तुझं आणि महेंद्रसिंग धोनीचं नातं दोन शब्दात सांग, असा प्रश्न केला. त्यावर विराटने त्याला हृदय जिंकणारं उत्तर दिलं.

    एका फॅन्सने विराटला कोड्यात टाकणारा प्रश्न विचारला. तुझं आणि माहीचं नातं केवळ दोन शब्दात सांग, असा अडचणीचा प्रश्न फॅन्सने विचारला खरा पण विराटने देखील तितक्याच खऱ्या मनाने उत्तर दिलं. ‘माझं आणि माहीचं नातं म्हणजे विश्वास आणि आदर…’ असं हृदय जिंकणारं उत्तर विराटने दिलं आहे. विराट कोहली आणि संघातील सहकारी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. यादरम्यान आपल्या फॅन्सशी ऑलनाईन गप्पागोष्टी करण्याचा विराटचा मूड झाला. त्याने इन्स्टाग्रामवरुन तशी सूचना आपल्या चाहत्यांना दिली. साहजिकच चाहत्यांना हेच हवं होतं.