राणीच्या बागेची ‘व्हर्च्युअल टूर’, लहान मुलांनी आनंद घ्यावा : महापौर

भारतात कुरक्षेत्रानंतर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात एकमेव कृष्णवडाचे झाड आहे. त्यानंतर आता या दुसऱ्या कृष्णवड वृक्षाचे रोपण करण्यात आले. 'व्हर्च्युअल टूर'च्या निवडक दृश्यांमध्ये पशुपक्षांच्या बारीक हालचाली, डोळ्यांच्या हालचाली तसेच भाव टिपण्यात आले आहेत.

  नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, मुंबई

  वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या व्हर्च्युअल टूर (ऑनलाईन) लहान मुलांना व नागरिकांना आनंद देणारी आहे. कोरोनाच्या या काळात लहान मुलांनी याचा आनंद जरूर घ्यावा, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या ‘व्हर्च्युअल टूर’ निवडक दृश्य ऑनलाईन प्रक्षेपणाचा शुभारंभ शनिवारी भायखळा येथे महापौरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.

  यावेळी उप महापौर ॲड. सुहास वाडकर, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, ऑनलाइन व्याख्याता डॉ. सुनाली खन्ना तसेच संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला महापौर व उपमहापौर यांच्या हस्ते प्राणिसंग्रहालयात दुर्मिळ अशा कृष्णवड प्रजातीच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले.

  यावेळी महापौर म्हणाल्या की, भारतात कुरक्षेत्रानंतर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात एकमेव कृष्णवडाचे झाड आहे. त्यानंतर आता या दुसऱ्या कृष्णवड वृक्षाचे रोपण करण्यात आले. ‘व्हर्च्युअल टूर’च्या निवडक दृश्यांमध्ये पशुपक्षांच्या बारीक हालचाली, डोळ्यांच्या हालचाली तसेच भाव टिपण्यात आले आहेत. मुंबईच्या नागरिकांना आता हा अनुभव अनुभवता येणार आहे.

  Virtual tour of Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo children should enjoy says Mayor kishori pednekar