विठ्ठल – रखुमाईची वेशभूषा साकारून कोरोनाबाबत जनजागृतीचा अनोखा प्रयत्न

विक्रोळी : गेल्या काही दिवसांमध्ये विक्रोळी-पवई-भांडुप या भागांमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यत पूर्व उपनगरात ४ हजारांच्यावर कोरोना रुग्णांचा आकडा गेला आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडादेखील

विक्रोळी : गेल्या काही दिवसांमध्ये विक्रोळी-पवई-भांडुप या भागांमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यत पूर्व उपनगरात ४ हजारांच्यावर कोरोना रुग्णांचा आकडा गेला आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडादेखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे विविध उपक्रमातून पालिका जनजागृती करत आहे.कोरोनविरोधात जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या मदतीला विठ्ठल-रखुमाई धावून आले आहेत, असेच म्हणावे लागेल, असे चित्र एस वॉर्डात दिसत आहे. रथावर बसलेले विठ्ठल रखुमाईंच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

पूर्व उपनगरात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने  होलोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेचा एस वॉर्ड विविध उपाययोजना करत आहे. १ जुलैला होऊ घातलेल्या आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाबाबत जनजागृती करणारी विठु रखुमाईची रथयात्रा आज काढण्यात आली.

पूर्व उपनगरात कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होण्याचे नाव नाही आहे. परंतु, सोशल डिस्टन्सिंगबाबत येथील नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे.  यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी आज एस वॉर्डतर्फे विठ्ठल-रखुमाई यांची वेशभूषा साकारून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी विठ्ठल रखुमाई यांच्या वेशभूषा केलेल्या कलाकारांनीसुद्धा मास्क घालून जनजागृती केली. आणखी दोन दिवस पवई , कन्नमवार नगर या भागात हा रथ फिरवण्यात येणार आहे.सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी सहायक पालिका आयुक्त संतोष कुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज विक्रोळी येथे कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी आज आम्ही रथ आणला आहे. विठ्ठल रखुमाई ची जोडीच्या माध्यमातून आज आम्ही जनजागृती करत आहेत. असे पालिकेचे अधिकारी बाजीराव खैरनार यांनी सांगितले.