महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही; निलेश राणेंची जोरदार टीका

हाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे (१९ जुलै) स्वतः गाडी चालवत सहकुटुंब महापूजेसाठी पंढरपुरात रवाना झाले आहेत. देशात संचारबंदी लागू असून पण मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह महापूजेसाठी निघाले आहेत. यावरून आता राजिक्य वातावरणात खळबळ माजली आहे. अनेक विरोधी नेते आपलं मत देत आहेत आणि आता भाजप नेते निलेश राणे यांनीही मुख्यमंत्रयंवर हल्लाबोल केला आहे.

    मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे (१९ जुलै) स्वतः गाडी चालवत सहकुटुंब महापूजेसाठी पंढरपुरात रवाना झाले आहेत. देशात संचारबंदी लागू असून पण मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह महापूजेसाठी निघाले आहेत. यावरून आता राजिक्य वातावरणात खळबळ माजली आहे. अनेक विरोधी नेते आपलं मत देत आहेत आणि आता भाजप नेते निलेश राणे यांनीही मुख्यमंत्रयंवर हल्लाबोल केला आहे.

    मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही

    आपल्या ट्विटर वरून निलेश राणे यांनी आपलं मत बेधडक पणे व्यक्त केलं आहे. ‘जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही, तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम??? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही. कारण, इतक्या सहजपणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही’, अशा शब्दात निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.

    मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत पंढरपुरला

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चाललेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचं हे दुसरं वर्ष ठरणार आहे.