VJTI's advice for strengthening bridges on the Eastern Expressway

पूर्व मुक्त द्रुतगती मार्गावरील पुलांच्या मजबुतीसाठी आता सरकारमान्य ‘व्हीजेटीआय’ तज्ज्ञ संस्थेचा सल्ला घेण्यात येणार आहे. यामध्ये आणिक पांजरपोळ येथील वाहतूक भुयारी बोगद्याची गळती थांबवण्यासाठी काम केले जाणार असून रस्त्याची दुरुस्तीही केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

    मुंबई : पूर्व मुक्त द्रुतगती मार्गावरील पुलांच्या मजबुतीसाठी आता सरकारमान्य ‘व्हीजेटीआय’ तज्ज्ञ संस्थेचा सल्ला घेण्यात येणार आहे. यामध्ये आणिक पांजरपोळ येथील वाहतूक भुयारी बोगद्याची गळती थांबवण्यासाठी काम केले जाणार असून रस्त्याची दुरुस्तीही केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

    पूर्व मुक्त मार्ग पुलांच्या संरचनात्मक स्थिरतेकरिता तांत्रिक सल्लागार म्हणून मे.टीपीएफ इंजिनीयरिंग लि. यांची नियुक्ती २०१६-१७ या कालावधीत स्थायी समितीच्या मंजुरीने नियुक्त केलेल्या सल्लागार मंडळातून करण्यात आली होती. सदर तांत्रिक संल्लागाराने तयार केलेल्या ७३ कोटी ७५ लाखांचा ढोबळ अंदाज पूर्व उपनगर अतिरिक्त आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला असता त्यांनी हा प्रस्ताव प्रमुख अभियंता (दक्षता) यांच्या अभिप्रायासाठी पाठवला होता. त्यांनी प्रस्तावाबाबत स्थायी तांत्रिक सल्लागार समितीचे अभिप्राय घेण्याचे सूचवले होते.

    यानुसार समितीमधील एक सदस्य व व्हीजेटीआयने जागेची पाहणी केल्यानंतर दिलेल्या तांत्रिक सल्ल्यानुसार व्हीजेटीआयची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी पालिका २३ लाखांचा खर्च करणार आहे.

    या कामासाठी सल्ला देणार

    • पूर्व मुक्त द्रुतगती मार्ग आणिक पांजरपोळ वाहतूक भुयारी बोगद्यातील गळतीबाबत
    • आणिक पांजरपोळ येथील रस्त्याचा सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या दुरवस्थेबाबत
    • आणिक पांजरपोळ येथील पोहोचमार्ग खचण्याच्या घटनांबाबत.